Operation

Posted by:

|

On:

|

O.T. च्या बाहेर बसून ती शून्य नजरेने बघत होती. राग, लोभ, द्वेष, आनंद, दुःख नक्की काय भावना आहेत तेच तिला समाजात नव्हतं, रवी ने हात हातात ठेवला होता operation चालू होण्या आधी, तो अजून तसाच होता. का ठेवला होता त्याने हात धरून? मी मधेच उठून निघून जाईन म्हणून? Operation थांबवायला सांगेन म्हणून? मला हे सगळं सहन होईल कि नाही याची त्याला अजून खात्री नाहीये म्हणून? काय माहित काय पण जसा आपल्याला उमाळा यायचा मधेच, तशी त्याची हाताची पकड अजून घट्ट व्हायची हे मात्र नक्की. कदाचित त्याला सांगायचं असेल या सगळ्यात मी आहे तुझ्यासोबत. पण त्याच असणं आता “ती” पोकळी भरून काढेल का?…. मधेच तिचं समोर लक्ष गेलं समोर “ते” दोघे बसले होते. काय विचार करत असेल समोर बसलेली ती? आज तिच्या मनात आणि माझ्या मनात जे वादळ आहे त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एकीसाठी युद्ध हरून आता संपूर्ण उध्वस्त झालाय, तर दुसरीची झुंझ जणू आता निकोपास आलीये. रवीने आपल्याला काही दिवसांपूर्वी हे सांगितलं तेव्हा आपला किती संताप झाला होता. तो योग्य होता कि चूक काय माहित, पण त्याक्षणी त्याने हा विचार करणही आपल्याला गैर वाटत होतं.😔 😔 

समोर बसलेला “तो” आपल्याला मधून मधून चहा कॉफी विचारात होता☕ . पण आपल्याला आता कशाची भूकच राहिली नाही तर त्याला तरी काय सांगणार. जे व्हायचं ते तर होऊन गेलं होतं या सगळ्यातून आपल्याला खरंच काही मिळणार आहे का? इथे बसायलाच मनाची इतकी ताकद वापरावी लागतीये… काय सांगू? कोणाला सांगू? लोकांना पटेल का? कि आपण दोषी वाटू… अपराधी वाटू? गेले काही दिवस देवाकडे अक्षरशः पदर पसरला… माझे प्राण गेले तरी चालतील पण “तिला” वाचाव😓 . पण कदाचित माझी प्रार्थनाच कुठेतरी कमी पडली आणि आज इथे बसावं लागलं… काय विचार करतोय आपण हा… किती स्वार्थी झालोत… समोर बसलीये ती सुद्धा एक आईच आहे. तिने तर इतके वर्ष दुःख भोगलंय. आपले अगदी हात जोडून आभार मानले तिने, तरी आपल्या मनातलं वादळ काही अजून कमी नाही झालं.

ती flashback मध्ये गेली हाच बेंच 11.30 तास बसलेलो. हात अगदी जोडून होते मनात एकच विचार.. माझे प्राण घे, पण माझ्या परीला वाचाव डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, अंग नुसते गरम झाले होते, एवढे कि त्याचा दाह होऊन शरीरभर आग लागेल अस वाटत होतं… आजूबाजूचे काही दिसत नव्हते, फक्त तो लाल दिवा आणि सगळे प्राण जणू त्यातच… का तिलाच असा असामान्य रोग व्हावा? जग अजून बघितलंय कुठे तिने… आताशी तर पूर्ण वाक्य बोलायला लागली होती. ३ रा वाढदिवस होऊन काही महिनेच तर झाले होते… आताशी तिला रंग, छटा उमजू लागल्या होत्या. आपला हात तिच्या कोमल बोटांनी पकडून इथे तिथे बागडायची ती घास भरवताना लाडेच हसायची रात्री झोपताना एकानंतर दुसरी किती गोष्टी लागायच्या तिला.

दिवा बंद झाला तशी प्राण एकवटून तिने ऐकलं… पण ते ऐकलं नसत तरच बरं झाल असत… या जन्मात हे ऐकावं लागेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. देवाला चांगली माणसं आवडतात म्हणून तो त्यांना लौकर बोलावून घेतो स्वतःकडे, अस नेहमीच ऐकत आली होती ती. पण हे अश्याप्रकारे समोर येईल असा वाटलं नव्हतं. देवावर खूप चिडली होती ती, तिला माहित होते काही गोष्टी विधिलिखित असतात, पण तरी देवाशिवाय कोण आपलं म्हणणं ऐकणार, त्याच्यावरच राग आणि नंतर माफी हि त्याच्याकडेच.. देवाचच मन एवढं मोठं कि आपण कितीही रागावलो तरी क्षमा करेल. डोळ्यासमोर अंधारी आली, तशीच कोलमडून पडली होती ती.

जागी झाली तेव्हा हॉस्पिटलच्या बेड वर होती, BP कमी झाला होता म्हणे… ती उद्वेगाने उठली पळत तिच्या बाळाकडे गेली. खूप खूप मुके घेतले, छातीशी लावलं, अंगाई म्हणू लागली… पण छे आज तिची परी कशालाच साद देईना. एवढाच सहवास होता आपला, आपल्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या परी बरोबर… तिला उभं देखील राहवत नव्हतं….हळू हळू तिने रुद्रावतार घेतला, मी नाही जाऊन देणार माझ्या बाळाला कुठे… ते माझं बाळ आहे…. कोणी नाही हात लावायचा माझ्या परीला… सगळे हताश होऊन बघत होते. रवी आला त्याने आपल्याला कोसळता कोसळता पकडलं. किती वेळ तो उद्वेग चालू होता तिला आठवत सुद्धा नव्हतं. राग, अश्रू, संताप, हतबलता यांनी जणू वर्तुळ केलं तिच्याभोवती. नंतर कधीतरी रवी आला, त्याने विचारलं “पूर्वा आपल्या परीचे नेत्रदान करावे अशी माझी इच्छा आहे.”…. “काय???”.. ती जोरात किंचाळली “अरे माझी परी जाताना तरी सुखरूप जाऊदे रे, आता अजून नका हाल करू तिचे.” खूप वेळ दाह चालला होता तिचा रवी शांत होऊन अपराधीपणे सगळं ऐकत होता. तिचा दाह शांत होण्याची वाट बघत होता.. नंतर तिला हलकेच पकडत म्हणाला “तुला माहितीये पूर्वा मी परीला Operation च्या आधी विचारलं होत… “बेटा इथून घरी गेल्यावर काय करणार तू, सांग बघू मला?” तेव्हा ती काय म्हणाली होती माहितीये…. “मला ना आईला खूप खूप बघायचंय, ती नेहमी माझ्या शोबत असतें मला गोल गोल खाऊ घालते, माझा पापा घेते, मला story सांगते, तुला माहितीये बाबा, मी झोपली ना तरी माझ्या dream मधे ती येते, एवढी मला ती आवडते, मला तिला पूर्ण वेळ बघायचंय, तिच्यासोबत खेळायचंय, तिच्याकडून मम् मम् खायचय, hospital मधे तिला जास्त बघताच आलं नाही, झोपच येते इथे.. घरी गेल्यावर तिला खूप खूप बघणार मी”… ज्यांना नेत्रदान करणार त्यांच्याशी बोलणं झालाय माझं, खूप समजदार लोक आहेत ते… त्यांची मुलगी सुद्धा मोठी आहे १५ वर्षांची तिच्यात जाण आहे. ती स्वतःहून म्हणाली “मावशी कधीही मला येऊन भेटू शकते” आता बोल आपल्या परीचे डोळे तिला मिळाले तर आपली परीच बघेल ना हे जग तिच्या डोळ्यातून… निदान अस समाधान तरी तुला राहील.काय बोलणार होतो आपण यावर मुकेच होकार दिला

आणि आता इथे “ते” operation संपण्याची वाट पाहतोय🚨  अचानक दरवाजा उघडला डॉक्टर आले “Congratulations, Operation अगदी successful झाले. 😇 उद्या पट्टी काढू…. उद्याचा दिवस आला श्वास रोखून ती रूम बाहेर थांबली. तेवढ्यात त्या मुलीची आई आली “प्रीतीने सांगितलंय डोळे उघडल्यावर तिला तुम्ही देखील सोबत हव्यात”…. “बापरे एवढी मोठी गोष्ट त्या मुलीला सुचली, 😪 आता मात्र तिचा धीर जात होता… पट्टी हळू हळू उघडली जात होती, तशी तिने रवीचा हात पकडला. रवीने आश्वासक प्रतिसाद दिला. पट्टी पूर्ण उघडली….. प्रितीने हलकेच डॉक्टर च्या सांगण्याप्रमाणे डोळे उघडले आणि आई अशी साद दिली तशी तिची आई आनंदाश्रूंनी न्हाऊन गेली. आपल्या समोर येऊन हात जोडले “तुमच्यामुळे आता माझी लेक हे जग बघू शकते. कधीच विसरणार नाही आम्ही हे” तेव्हढ्यात तिच्या कानावर शब्द आले “मावशी ये ना इथे “…. प्रितीने तिला हाक मारली होती. रवीचा आधार घेतच ती जवळ गेली. एक क्षण दोघींचे डोळे भेटले, तिला अस वाटलं तिची परीच बघतीये तिच्याकडे… मनातलं काहूर काही अंशाने स्थिर झाल्यासारखं वाटलं. तिला उगीच वाटलं प्रीतीच्या डोळ्यांत तीच चमक आहे…. “परीची”…. प्रीतीच्या डोळ्यांचे कडे मात्र उगीच पाणावले वाटले तिला.❤️ 

– Seema ©

P.S. organ donation awareness साठी हा लेख लिहीला…organ donation हा फारच नाजूक आणि खाजगी विषय आहे. त्यात एका आईच्या मनाची घालमेल आणी नंतर मिळणारे समाधान शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न ..काही technical चुका असल्यास क्षमस्व

Posted by

in

Share via
Copy link