About

Growing in a family full of readers my childhood days were filled with reading different kinds of books. My home was a small library where everyone loved to read. I always thought that writing is a very powerful tool, a tool that can bridge a gap between the thoughts of writer and readers. As I walked through different paths of life, it made me understand different social factors and how people are connected to each other through these factors. Some paths are filled with gratitude, joy, happiness while some have sorrows, regrets, distress, but be it happiness or sorrow each path gives us a unique lesson, that’s how life teaches us to move further. We grow through these experiences, some belong to us, some belong to the society where we live in. My main purpose behind creating this blog is to walk readers down through these different paths, journeys, emotions. Since Childhood I have seen my parents doing Social Work, this is my bit of creating social awarness by writing on some sensitive topics. There are many areas in our society which needs attention at large. I hope to put light on those and that my readers will empathize with the articles and message that I want to convey through these articles.

तुमचा माझा सर्वांचाच जीवन नामक प्रवास सुरु असतो. या प्रवासात बरेच उतार चढाव येतात, काही अनुभव आपले तर काही आपल्या सोबत प्रवास करणाऱ्यांचे. आकाशातील इंद्रधनुष्याप्रमाणेच हे अनुभव सुद्धा सप्तरंगी असतात. काही लाल केशरी आनंदाचा शिडकावा करणारे, तर काही दुःखाची बोचरी सल असलेले. पण या सर्व अनुभवांतून एक सप्तरंगी जीवन नामक प्रवास होतो. लहानपणापासूनच आई वडिलांना समाजकार्य करताना पहिले, तिथूनच काहीतरी करावं असं नेहमी मनात होतं. या ब्लॉगद्वारे समाजातील काही गुंतागुंतीचे प्रश्न वाचकांसमोर आणण्याचा माझा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न राहील. समाज वैज्ञानिक दृष्ट्या खूप गतीने पुढे जातोय पण या मार्गातून प्रवास करताना कुठेतरी वैचारिक, मानसिक, अध्यात्मिक मागासलेपण तर येत नाहीये ना? समाजात आपण अनेक प्रश्न बघतो उदाहरणार्थ, अगदी रस्त्यावरून जाताना सुद्धा एखादी निराधार व्यक्ती, गरिबी, असहायता बघितल्यावर आधी जी मनाची पिळवणूक व्हायची ती आता का बरे होत नाही? कुठेतरी आपले मन वास्तविकता स्वीकारता स्वीकारता बधिर तर झाले नाही ना याचा मागावा घेताना असे बरेच प्रश्न, समस्या मला दिसू लागल्या. माझ्या आर्टिकल्स मधून समाजातील हे प्रश्न मांडण्याचा माझा हा छोटासा प्रयास. अर्थात जसे उतार असतात तसेच चढाव देखील असतात. निराशेचे काळे ढग असले तरी प्रत्येक रात्रीनंतर दिवस येतो, तसेच दुःखानंतर सुखही नक्कीच येते आणि यालाच जीवन म्हणतात. याच उतार चढावांचा प्रवास एकत्र करूयात.

Seema

Seema