जत्रा

Posted by:

|

On:

|

कधी नव्हे ते आज ती जरा nervous होती West चे Regional Head आले होते आणि नेमका याच month मध्ये तिच्या Department चा Performance “upto the mark” नव्हता😣 😣 . Head of the Department पण त्यामुळे जरा नाराजच होते… कशी presentation देणार होती …विचार करून जरा tension च आला होतं😖 😖 ..Lunch Break झाला, भूक असूनही खावंसं वाटत नव्हतं तिला… कधी एकदाचं presentation देऊन मोकळी होतीये अस झालेलं तिला…”अगं तुझा phone vibrate होतोय लक्ष कुठंय” 📱 शिल्पाच्या आवाजाने ती दचकलीच….आईचा phone.

Phone उचलून काय ऐकलं तिला समजण्याआधीच phone जणूकाही हातातून खालीच सरकला… जणूकाही तिचे सगळे स्नायूच सुन्न झाले… दोन मिनिटे फक्त दोनच मिनिटे अंधारी आली… जणू फडके सरांचा लांबून आवाज येतोय कुठून, असं तिला वाटत होतं ….कोणीतरी तिला खुर्चीवर बसवलं होतं. सगळे विचारत होते… काय झालं?… कसं सांगू?… का आवाज येत नाहीये बाहेर?…. तिला जे शब्द सुचले ते आणि तसे रचून तिने जमेल तसं सांगितलं….. “यांच्याबरोबर यश ला पाठवा she is not in a state to travel alone …Mrs. Anuja someone else can give presentation for the day you please do the needful… Yash will accompany you please let us know if you need any further help”…. तिला thank you हा शब्दही सुचला नाही …

कुठे जाऊ? असं वाटलं पूर्ण जग रणांगणासारखं तिच्या अवती भोवती फिरतंय… “Anuja please तू जरा विचारतेस का Police मध्ये inform केलाय का…. नाहीतर आपण सगळ्यात आधी तुमच्या Police Station ला जाऊयात… जेवढ्या लौकर process चालू होईल तेवढं बरं” ….तिने mechanically phone काढला…विचारलं…आधी Police Station ला जावं लागणार होतं तर … “अहो एवढ्या लौकर आम्ही complaint नाही घेत”…. तिला आता सगळं सांगण्याएवढे सुद्धा शब्द गोळा करता येत नव्हते…. यश ने मग सगळं सांगितलं….तपास सुरु झाला असेल किंव्हा नसेल… ती सरळ बाहेर पडली आणि आठवून आठवून प्रत्येक ठिकाणी वेड्यासारखी धावत सुटली…. एक जागा झाली कि दुसरी ती झाली कि अजून दुसरी … 

“बाबा बाबा “….”बाबा बाबा”… जोरजोरात ओरडत होती ती …या जत्रेतले पाळणे 🎢  🎡  पहिल्यांदा तिला भयानक वाटायला लागले… गर्दी अगदी घुसमटायला लागली…. गालांवरती पाणी येऊन येऊन आता ते सुद्धा सुकत आल 😥  😥 …. चोहोबाजूंनी अनोळखी भयानक चेहरे…. आता तिथल्या Ice Cream च्या गाड्यापण तिला बेचव वाटायला लागल्या 🍧 …. इतक्या आवाजात आपला आवाज कसा पोहोचणार बाबांपर्यंत…. तिला समजतच नव्हते😖  तरी ती घसा फुटेपर्यंत ओरडत होती…. “तू कधी हरवलीस तर लक्षात ठेव बेटा बाबाचा हात ज्या ठिकाणी तुझ्या हातात होता, त्या ठिकाणी जायचं आणि तिथेच थांबायचं…. बाबा तुझ्यापर्यंत पोहोचणार… अगदी कुठेही असला तरी पोहोचणार”…तिला आठवले बाबाचे शब्द…. तिला आठवलं मोठ्या पाळण्यात बसायचं म्हणून ती हट्ट करत होती, तिथल्या counter वर बाबा तिकीट काढताना तिने त्याचा हात सोडला होता… हवेत उडणारा फुगा पकडण्यासाठी🎈 … हा तिथेच तिथेच जाणार मी तिथेच उभी राहणार… ती तिथेच गेली आणि हातातली बाबाने दिलेली बाहुली  💃 जमेल तितक्या वर पकडली “बाबा बाबा” …”बाबा बाबा”…बाबाने पळत येऊन तिला वरती उचलले होते… किती पापे घेतले असतील तेव्हा बाबाने आपले काय माहित …

“अनुजा”…”अनुजा”…अचानक भूतकाळातून तिला कोणीतरी खेचून बाहेर काढलं….. “नको ना मला आताच तर बाबा भेटला…please मला तिथेच राहूदे…मला माहितीये मी हरवली तर बाबा मला नक्की शोधेल…पण बाबाच हरवला तर मी त्याला कसं शोधू  😪 …please please यश नको… मला हुडकलंय बाबाने …तोच मला हुडकू शकतो रे… मी कशी त्याला शोधू  😪 …मी नाही झाली एवढी मोठी …मला छोटंच राहायचंय…. मला नाही जमत ए ….”….”अनुजा please मी समजू शकतो you are going through a lot ” पण please आठव ते कुठे कुठे जाऊ शकतात?….

बाबांना Alzheimers आहे ते कुठे जातील? काय करतील? काहीच समजत नव्हतं तिला…. Alzheimers झाल्यापासून त्यांना एकटंच बाहेर कधी जाऊ दिलं नव्हतं. त्यांच्याबरोबर नेहमी कोणी ना कोणी असायचं … त्यांच्या रोजच्या जागा…. सकाळी ते आणि आई जातात तो jogger’s पार्क, नातेवाईक, मित्रमंडळी, संध्याकाळी ते आणि आई फिरायला जातात ते garden.. सगळं सगळं बघून झालं watsapp, phone calls किती आणि काय रात्रीचा अंधार पसरत होता तसा तिच्या मनातला अंधार सुद्धा वाढत जात होता ….

बाबा – 

कठपुतळीतल्या बाहुल्या जश्या दुसऱ्याच कोणाच्यातरी मर्जीप्रमाणे हातपाय हलवत असतात, तसं काहीतरी होतंय… काहीच समजत नाहीये मी कुठे आलोय… कसा आलोय आणि कधी आलोय… आतून बंद असलेला दरवाजा जसा बाहेरून कितीही प्रयत्न केला तरी उघडत नाही, तसाच मेंदू अगदी कितीही आकांत केला तरी काही संदेश देत नाहीये … मुळात मी काही प्रयत्न करावा का? आणि केलाच तर का करावा? कुठे जायचंय आपल्याला? कोणाकडे? कुठून आलोय? छे एखाद्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा जेवढा प्रयत्न करू तेवढे जास्त आत रुतत जातो, तसं काहीतरी वाटतंय… हे कोडं एवढं मोठं होतं चाललंय कि आता अगदी सुन्न झाल्यासारखं वाटतंय…. शरीर जिथे नेतंय तिथे आपोआप जातोय… ना कुठला मार्ग ना कुठला मुक्काम…पण हि जागा सुरक्षित वाटतीये… ओळखीची वाटतीये…माणसं येतायत जातायत… का हे सगळं एवढं परिचयाचं वाटतंय? केवढी हि गर्दी..जणू सगळे ठिपके…कधी हि माणसं ठिपके होत होते तर कधी ते ठिपके माणसं होत होती…. कोणीच ओळखीचं नाही, तरी का इथेच थांबावास वाटतंय? अंधार झालाय तरी इथे बऱ्यापैकी माणसं आहेत ते कुठूनतरी येतायत आणि ना जाणो कुठे जातायत…या एवढ्या भरधाव गाड्या… एखादी आपल्या अंगावर आली तर …पापण्या आता बंद होतायत…. शरीर थकतंय गुंगी येतीये…अंधार झाला …पूर्ण….

अनुजा-

Police station वरून phone आला तसा थरथरत, पहिल्या रिंग वर तिने उचलला आणि ज्या अवस्थेत होति त्या अवस्थेत धावत सुटली…. पूजा कालपासूनच घरी आलेली… ती मागून लगेच scooty घेऊन आली, तिच्या मागे बसली आणि भरधाव Police statopn कडे गेली ती…. “जीव मुठीत धरून पळणे” कशाला म्हणतात त्याची प्रचिती आता येत होती तिला… जशी स्टेशन वर पोहोचली तशी पायात  भिंगरी लागल्यासारखी आत घुसली…. श्वास अगदी रोखून नजर पूर्ण स्टेशन चा धावा घेत होती आणि शेवटी नजर स्थिर झाली एवढा वेळ रोखून धरलेला बांध फुटला ….”बाबा”…. पळत पळत अगदी हवेसारखी ती बाबांजवळ जाऊन रडायला लागली 😢 ….

“अहो तुमचे वडील ४२ वर्ष दादर ला काम करायचे रोजचा ट्रेन चा प्रवास कदाचित त्याच सवयीने ते दादर स्टेशन ला आले असतील. रात्रभर इथेच होते बहुतेक… सकाळी भूक लागली असेल तर तेही सवयीप्रमाणे नेहमी ज्या इडली वाल्याकडे जाऊन इडली खायचे तिथेच गेले …इडली वाल्याने ओळख दाखवून बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा यांना काही आठवले नाही, मग त्याला जरा शंका आली आणि तोच इथे घेऊन आला ….ते दादरपर्यंत कसे आले? रात्रभर त्यांनी काय केलं? हे सगळं CCTV चेक केल्यावर समजेलच, पण महत्वाचं म्हणजे ते सुखरूप आहेत….”

पोलीस सगळे इथंभूत माहिती देत होते पण तीच लक्ष फक्त बाबांकडे होतं 😇 …. ती सगळीकडून नजर फिरवत होती… कुठे काही लागलं तर नाहीना बघत होती… त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी काही ओळख दिसतीये का बघत होती … त्यांना स्पर्श करून त्यांचा हात हातात घेऊन सगळं ठीक आहे, तुम्ही आता सुरक्षित आहेत…. असं मुकं आश्वासन देत होती …. तिला तिच्या बाबाचा हरवलेला हात सापडला होता ….तिला आता परत तिचं हरवलेलं जग सापडलं होतं ❤️ ….

Seema ©

P. S. – Alzheimers ह्या मानसिक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा लेख लिहिला आहे …आपल्या समाजात जेवढं महत्व शारीरिक आजारांना दिलं जातं तेवढी जागरूकता अजून मानसिक रोगांबद्दल दिसून येत नाही …भारतात सध्या ८.८ Million वृद्धांना हा त्रास आहे …या त्रासाचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक महिलांमध्ये दिसून येते… यात आपण जमेल तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे… काही technical चुका असल्यास विनम्र माफी 


Posted by

in

Share via
Copy link