ठेव

Posted by:

|

On:

|

पोहोचली तेव्हा प्लॅटफॉर्म वर गाडी उभीच होती.  तिच्या विंडो सीट वर सामान लावून ती बसली..  “काय ग मीनाक्षी flight ने किती लौकर येता येत आणि तू तिकीट afford करू शकतेस ना. मग नेहमी हा अट्टाहास का ट्रेन ने overnight journey चा? तुला आवडत असेल पण आम्हाला टेन्शन येत ना तू येईपर्यंत. सकाळी flight पकडली असतीस तर ३ तासात पोहोचली असतीस ना.” आईने नेहमीच्या स्वरात नाराजी व्यक्त केली होती. पण आता आईला कसा समजवायचं ती का नेहमी ट्रेन prefer करते ते. एकतर airport ला वेळेआधी तासभर पोहोचा नंतर flight ✈️ मध्ये बसण्याआधीच एवढ्या formalities असतात कि त्या प्रवासाची मज्जाच जाते. तिला आपलं उगीच वाटायचं flight म्हणजे सगळंच खूप formal अगदी entry केल्यापासून ते प्रत्येक counter, air hostes वगैरे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर plastic smile….शिकवल्यासारखी. त्यातले किती अगदी मनापासून आपलं स्वागत करत असतील याचा प्रश्न पडावा इतकं एकाच हसू दुसऱ्यासारखं, काही वेगळेपणाच नाही. त्यापेक्षा या ट्रेन 🚇  मध्ये वेग वेगळे चेहरे दिसतात आजूबाजूला बसलेल्या families 👨‍👩‍👧‍👦 कधी एकमेकांमध्ये तर कधी आपल्याशी बोलतात, हसतात आणि मुख्य म्हणजे त्यात काही यांत्रिकपणा नसतो किंव्हा जबरदस्तीने बोलायचंच आहे असा अविर्भावहि नसतो. त्या flight च्या औपचारिक चहा कॉफी पेक्षा ट्रेन मध्ये येणाऱ्या फेरीवाल्यांचं खाण्यात  😋  मज्जाच काही और होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री ट्रेन ने जाताना विंडो सीट वर तीच आवडीचं नॉवेल काढायचं. कधी नॉवेल वाचायचं तर कधी बाहेरचा निसर्ग पाहायचा आणि खिडकीतून येणारा तो गार वारा आहाहाहा.  😍  😍  😍 … हे सर्व flight मध्ये मिळू शकेल का? मुद्दाम तिने dinner केला नव्हता.

हळू हळू फेरीवाले येऊ लागले तिने मस्तपैकी इडली वडा मिक्स प्लेट 🥣 आणि वाफाळती कॉफी ☕  घेतली. बास… रात्रीचा quota complete तिने मृत्युंजय काढलं, तीच सगळ्यात लाडकं पुस्तक 📙. कितीदा वाचल असेल तिने सांगताच येणार नाही. पाचव्यांदा वाचताना तिने count करण सोडून दिलं होत. कोणतही पान उघडायचं आणि चालू करायचं तंद्री लागलीच पाहिजे, इतकं आवडायचं ते तिला. बाहेर अंधार होता तरी दूर कुठेतरी दिसणाऱ्या lights मुळे थोडा प्रकाश होता. गार वारा …थोडावेळ डोळे मिटून तिने मनसोक्त श्वास घेतला आणि वाचायला लागली. पण छे आज काही मन लागत नव्हतं. तसही गेले वर्षभर हेच होत होतं. तिला वाटलं आता हे असच होणार आयुष्यभर… ती सल, पोकळी कधीतरी भरेल का? विचार करता करता कधी डोळा लागला कळलंच नाही. उठली तेव्हा घड्याळ बघितलं. अजून पुणं यायला तासभर होता. चहावाला फिरत होताच मग चहा आणि वडा मस्त नाश्ता झाला.

पुणं आलं नेहमीप्रमाणे रिक्षा 🛺 पकडून ती पोहोचली रिक्षाबाहेर पाऊल ठेवताच तिला अगदी भरून आलं. काहीतरी जड छातीवर ठेवल्यासारखं. पाय चालत होते पण सगळं यांत्रिकपणे. सगळ्या आठवणी सगळंच कसं विचित्र वाटत होतं. तिथलं सगळंच आता वेगळं वाटत होत. अगदी तिथली हवादेखील तिला सलत होती. का अस होतं आपल्याला? ती जाताना सोबत तर होतोच ना.. अगदी  हातात हात होता… तिची स्मृती गेलेली, कदाचित समजलही नसेल तिला आपण सोबत होतो ते… तेव्हापासून आत्तापर्यंत जणू तिच्या डोळ्यातली पोकळ मनात घेऊन फिरतोय… हे असच राहील का नेहमी? वाटलं मनसोक्त रडून झालं कि आपोआप सगळं पूर्ववत होईल. पण छे आता एक वर्ष झालं तरी तीच सल मनात… सगळीच गडबड चालू होती मावशीने तिला बघितलं तशी लगबगीने आली. “ये ये दमली असशील, आई भटजींबरोबर बोलतीये, मामा सामान आणायला गेलाय, मी जरा इथलं आवरायला घेतलं तर या सगळ्यांनी आजीची ट्रंक काढलीये बघ”  हातपाय धुऊन ती सगळ्यांसोबत बसली. एक एक सामान बाहेर निघत होतं काही चांदीची भांडी, काही जुने फोटो, काही कपडे, दागिने. एकदम तीच लक्ष त्या वहीकडे गेलं… अरेच्या हि वही  📒 ? हि तिने जपून ठेवलेली? नाही दुसरीच कोणती असेल.. अस करत तिने वही उघडली… तर तीचीच निघाली. आज्जीच्या या महत्त्वाच्या सामानात माझी वही  😪 …अक्षर अजूनही लक्षात आहे, रोज न चुकता एक विषय असायचा, गणित इंग्लिश मराठी…एक तास अगदी compulsory अभ्यास. मग दुपारी जेवण झालं कि कुल्फी, शेंगदाणे वगैरे कोणी फेरीवाले यायचे, त्यांचा खाऊ.

संध्याकाळी खेळून झालं कि मंदिरात जायच्या दोघी, तशी तिला भजनापेक्षा तिथे येणाऱ्या लोकांची चौकशी करण्यात जास्त रस होता. “अगं तेवढच आजूबाजूला काय चाललंय हे समजत. मी हि अशी इथे एकटी असते, कधी काही झालच तर निदान या मंडळींना मी देवळात येत नाही हे बघून तरी कळेल” ती जेव्हा असं म्हणायची, तेव्हा किती त्रास व्हायचा आपल्याला. 😔  😔  ८ नातवंड तिचे, पण आपल्याला सोडून दुसरं कोणीच कधी यायचं नाही तिच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत. म्हणे ती teacher होती strict आहे, आम्हाला सुट्टीत मजा करायची असते, तूच जा. पण तिला मात्र खूप आवडायचं सुट्टी कधी संपायची कळायचंच नाही. म्हणून का आपल्याला एवढा त्रास झाला ती गेली तेव्हा? एका वहीसोबत पूर्ण फ्लॅशबॅक आठवला तिला.

नकळत भटजीचे मंत्र, बाकीच्यांची विचारपूस सर्व मागे पडलं… आवाज धूसर होत गेले… पावलं त्याच देवळाकडे वळली🛕 . ती आज्जीच्या जागी जाऊन बसली. देऊळ अगदी शांत होत. अचानक तिला मंद अश्या घंटानादात भजन ऐकू यायला लागलं जणू सगळे आसपास आहेत. आज्जी सगळ्यांची खुशाली विचारतीये👵 , कोणीतरी विचारलं “आजी हि कोण?” ……”हि माझी नात 👩‍🦰 , सुट्टी पडली कि माझ्याकडे येते. मी सांगते तिला या म्हाताऱ्या आजीकडे तुला खेळवायला काही नाही. तरी दरवर्षी सुट्टी लागल्या लागल्या येते🏃‍♀️ . वर्षभर वाट पाहते हो… हि माझी आणि मी हिची” शब्द परत पुसट होत गेले…. डोळे उघडले तेव्हा सगळ शांत वाटत होतं.

ती वही घेऊन परत घरी निघाली. आता इथलं काहीच वेगळं वाटत नव्हतं. जादूची काडी फिरवावी तसं सगळं पूर्ववत झालं होतं.😇  घरी येताच आजीच्या फोटोला नमस्कार केला, त्यात परत तिला तीच आज्जी दिसली बाहेरून strict तरी आतून प्रेमळ. आता मनातली सल जाणवत नव्हती, मन अगदी हलकं झालं होतं. एखाद कोडं सुटावं तस तिला वाटत होत. आपण आज्जीच्या ऐवढया जवळ असुनही फक्त आपली आणी आज्जीची एकही आठवण आपल्याकडे का नसावी? याची ती सल होती….पण ती सल, ते कोडं सुद्धा शेवटी आज्जीनेच सोडवल होतं. 🥰 आता आयुष्यभर तिच्या बरोबर राहणार होती….. आता फक्त आणि फक्त तिच्या आज्जीची आणि तीची एक सुरेख “ठेव” तिच्याकडे कायम राहणार होती.

झिम्मा मूवी मधला एक dialogue आठवला तिला ” माणसं, जागा, जातात ….वस्तू राहतात ” त्याचा अर्थ आज समजला होतं तिला. पूर्वजांचा खजिना म्हणतात तो हाच का? तुमच्याकडेही अशी तुमच्या एखाद्या प्रेमळ व्यक्तीची ठेव असेल तर कंमेंट जरूर करा.

Seema ©

Posted by

in

Share via
Copy link